श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीसाठी नगरपालिका सज्ज!
‘बाप्पा’च्या विसर्जन मिरवणुकीसाठी नगर पालिका प्रशासनाकडून विविध उपायययोजना केल्या जात आहे. मंगळवारी, बुधवारी अशा दोन दिवस नगर पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करण्यात आली. तसेच मिरवणुक मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या श्री गणेशाचे विसर्जन भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात करण्यात येते. येथील विहीरीवर प्रकाश व्यवस्था तसेच इतर व्यवस्था नगर पालिका प्रशासनाकडून केली आहे. त्याचप्रमाणे जनुना तलाव येथेही मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली. विसर्जनाच्या खामगाव : जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आलेल्या गाळाची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात आली. विहिरीतील
गाळ जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आला. ठिकाणी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निर्माल्याची विल्हेवाट ! नगर पालिका मैदानावरील विहीरीतील विसर्जीत गणेश मुर्ती व निर्माल्य जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले.
या निर्माल्याची विल्हेवाट व्यवस्थित पध्दतीने लावण्यात आली. प्रकाश व्यवस्था ! श्रींचे विसर्जन होत असलेल्या विहिरीवर तसेच जनुना तलावावर नगर पालिका प्रशासनाच्यावतीने प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. इतरही व्यवस्था येथे केली