नांदुरा: भरधाव टिप्पर ने दिली दुचाकी स्वाराला धडक एकाच मृत्यू तर एक गंभीर जखमी.

भरधाव वेगाने येणारा टिप्पर आणि त्याने दिलेली दुचाकी स्वाराला धडक हे घडलंय नांदुरा तालुक्यातील हिंगणे गव्हाड ते चांदुर बिस्वा या गावच्या रस्त्यावरती या भरधाव टिप्पर च्या धडके मुले चांदुर बिस्वा येथील रहिवासी चा मृत्यू झाला सादर तक्रार मृतकाच्या चुलत भाऊ मोहम्मद मुस्ताक अब्दुल सत्तार यांनी दिली.

तक्रारी नुसार आरोपी टिप्पर चालक चांदुर बिस्वा ते हिंगणे गव्हाड रस्त्यावर असलेल्या शास्त्री याच्या शेताजवळ आरोपी पवन भिडेकर रा. वडनेर भोलजी याने चालवत असलेला टिप्पर निष्काळजी पने चालवून शेख अमीन शेख कलीम याच्या दुचाकी ला जोरदार धडक दिली यात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

या अपघातात दुचाकी चे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फिर्यादी ने दिलेल्या तक्रारी मुले आरोपी पवन भिडेकर विरुद्ध ३३८,२७९,३०४ सहकलम १९६,१३४,१८४,१८५,१४६ मोटार वाहन कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमंलदार खोंदील करत आहेत.

Leave a comment