मलकापूर: पत्नीसह चिमुकल्या मुलीची धार धार शास्त्राने गळा चिरून हत्या

मलकापूर: १० महिन्याच्या चिमुकल्या मुलीची व पत्नी ची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या मालकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा शिवारात १२ एप्रिल ला घडली.

तालुक्यातील जांभूळ धाबा येथील रहिवाशी विशाल झनके (३० वर्षे ) याचा खान्देशातील देऊळगाव गुजरी येथील प्रतिभा नावाच्या मुलीशी विवाह झाला. यांना दिव्या (१० महिने ) व प्रिया (वय २ वर्षे ) ह्या दोन मुली होत्या. प्रतिभा झनके मागील गत दोन महिन्यांपासून आई वडिलांच्या घरी देऊळगाव गुजरी ला गेली होती.

विशाल याने काही दिवसापूर्वी २ वर्षीय मुलगी प्रिया हिला सासरी जाऊन परत आपल्या घरी आणेल होते. शुक्रवारी सकाळी विशाल हा दुचाकी घेऊन देऊळगाव गुजरी ला आपल्या सासरी गेला तिथे सासू सासरे घरी नसताना प्रतिभा व चिमुकल्या दिव्या या दोघीच धार धार शास्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली. हे सगड झाल्यानंतर तो घटनास्थळावरून घरी परतला. दुपारी २ च्या वेळेस विशालने जांभूळ धाबा शिवारात असलेल्या मालकीच्या शेतात जाऊन विहिरीत मोठा दगड पायाला बांधून उडी घेऊन आत्महत्या केली.

या घटनेत खान्देशातील फत्तेपूर पोलीस ठाण्यात विशाल झनके विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मलकापूर ग्रामीण पोलीस यांनी त्याच्या आत्महत्येला आकस्मित मृत्यू नोंद केली आहे.
पुढील तपस ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप काळे व त्यांची टीम करत आहे या प्रकरणामुळे खान्देशातील देऊळगाव गुजरी व तालुक्यातील जांभूळ धाबा येथे एकच खळबळ झाली व नागरिकांना माहिती होताच त्यांनी एकच गर्दी केली.

Leave a comment